Bus viral video लोकल ट्रेन आणि बसमध्ये सातत्याने माराहाणीच्या घटना घडत असतात. अनेकदा सीटवर बसण्यावरून, तर काही वेळा अगदी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची, मारहाण होताना दिसते. बसमध्ये काही वेळा बस वाहकाबरोबर तिकीट किंवा सुट्या पैशांवरून प्रवाशांचे वाद होतात. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये बसमधील तिकिटाच्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद सुरू आहे. या वादाचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. यावेळी कंडक्टरने प्रवाशाला चक्क सीटवर झोपवून तुडवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
येथे क्लिक कर
तिकिटाच्या पैशावरुन बस कंडक्टर अन् प्रवाशामध्ये वाद
ही घटना शनिवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घडली, ज्यात रात्रीच्या वेळी चालत्या बसमध्ये कंडक्टर प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसतोय. बसमध्ये तिकिटाचे पैसे मागितल्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद सुरू झाला. काही वेळात हा वाद इतका टोकाला पोहोचला की, दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. अखेर इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण सोडवले. पण, या घटनेमुळे बस रस्त्यातच मधोमध थांबवण्याची वेळ आली.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
समोर आलेल्या माहितीनुसार, ही संबंधित बस लखनौहून कानपूर उन्नाव आगाराकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा ही बस कृष्णनगर येथे पोहोचताच एक प्रवासी बसमध्ये येऊन बसला. यावेळी कंडक्टरने प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागताच प्रवाशाने त्याच्याजवळ पास असल्याचे सांगितले. कंडक्टरने पास तपासणीसाठी मागितला तेव्हा त्याला आढळले की, तो पास २०२२ रोजीचा आहे. त्यानंतर प्रवाशाने मी स्वत: एक बस कर्मचारी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. यातूनच अखेर वादाला सुरुवात झाली.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
दोघांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद अखेर हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. वाहकाने प्रवाशाला बेदम मारून, नंतर बसमधून खाली उतरवले. या घटनेमुळे इतर प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. कारण- बस अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली होती. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बस वाहक चक्क भरबसमध्ये सीटवर चढून एका प्रवाशाला मारतोय. प्रवाशाचा हात पकडून, त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय. या घटनेवर लोक आता तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.