Hand Hanging in Cars Boot Video सध्या सोशल मीडियावर वाशी आणि सानपाडा स्थानकांच्या दरम्यान एका गाडीच्या डिकीमधून हात बाहेर लटकलेला दिसत असल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील एका जागरूक नागरिकाने हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेऊन कारवाई केली आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
डिकीतून अचानक दिसला हात आणि…
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या डिकीमधून अचानक एक मनुष्य हात बाहेर काढतो, असे दिसते. हा विचित्र प्रकार नवी मुंबईतील एका व्यक्तीने पाहिला आणि लगेच आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला, तेव्हा तो मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे, “अरे देवा! या गाडीच्या डिकीमधून कोणाचा तरी हात बाहेर दिसत आहे. बघा… बघा… बहुतेक हा मृतदेह असावा.”
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हा व्हायरल व्हिडिओ जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचला, तेव्हा नवी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या टीमने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या गाडीचा शोध घेणे सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सोमवारी सायंकाळी सुमारे पावणेसात वाजता (६:४५ PM) चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर, रात्री साडेआठच्या सुमारास (८:३० PM) पोलिसांनी घाटकोपरजवळ त्या गाडीचा शोध घेतला. तपासानंतर असे आढळले की, गाडीमध्ये असलेले तीन तरुण त्यांच्या लॅपटॉपच्या जाहिरातीसाठी ‘रील्स’ बनवत होते.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांनी या घटनेची माहिती देताना Hand Hanging in Cars Boot Video सांगितले, “हे तरुण मुंबईचे रहिवासी आहेत आणि ते एका लग्नासाठी नवी मुंबईत आले होते. आम्ही त्यांना ताब्यात घेतले आणि या घटनेची सत्यता पडताळली. तपासामध्ये आम्हाला कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही.”
पोलिसांनी त्या तरुणांकडून त्यांचे सर्व व्हिडिओ ताब्यात घेऊन तपासले. त्यांना असे दिसून आले की, त्या रीलचा उद्देश असा होता की, जेव्हा एखादा दुचाकीस्वार त्यांची गाडी थांबवतो आणि डिकी उघडायला सांगतो, तेव्हा पहिल्यांदा डिकीमधून एक हात बाहेर लटकलेला दिसेल. ज्या मुलाचा हात बाहेर दिसत होता, तो मुलगा नंतर डिकी उघडतो आणि म्हणतो, “घाबरलात? पण मी जिवंत आहे. मी मेलो नाही. थांबा, आमच्या लॅपटॉपवरची खास ‘ऑफर’ ऐका.”