समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा

Samaj Kalyan Vibhag Bharti समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांच्या जागा भरायच्या आहेत. यासाठी अधिसूचना समाज कल्याण विभाग, पुणे यासिनच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. यामध्ये २१९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर २०२४ आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

पदाचे नाव – समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पदसंख्या – वरील पदांवर एकूण २१९ जागा भरण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असेल.

अर्ज करण्याची पद्धत – इच्छूक उमेदवारांना ओनलाईन पध्द्तीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर २०२४ ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/en

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

शैक्षणिक पात्रता
१. गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) / गृहपाल / अधिक्षक (महिला) या पदांसाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य देण्यात येईल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३. समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

अधिकृत वेबसाईट

४. उच्चश्रेणी लघुलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
५. निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण असावी.
६. लघुटंकलेखक या पदासाठी शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आवश्यक

Leave a Comment